जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था
कार्ये :
- १. जिल्ह्यातील १००% मुलांची (CWSN) सह पटनोंदणी व उपस्थिती याकरिता शाळांमधून अध्ययन पूरक वातावरण निर्मिती.
- २. राज्य प्रशिक्षण धोरणानुसार जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी गरजाभिमुख व मागणीनुसार प्रशिक्षण उपक्रमांची वार्षिक दिनदर्शिका विकसित करून प्रभावी अंमलबजावणी करणे.
- ३. विद्यार्थी संपादणूक चाचणी, शासकीय व अशासकीय संस्थांनी केलेली सर्वेक्षणे यावरून जिल्ह्याची शैक्षणिक सद्यस्थिती विश्लेषण करून आवश्यकतेनुसार जिल्हास्तरीय कृती कार्यक्रमाची निर्मिती व अंमलबजावणी
- ४. देशपातळीवरील, राज्यपातळीवरील विविध शैक्षणिक संशोधने यांच्या निष्कर्षानुसार जिल्ह्यात शैक्षणिक कृतिकार्यक्रमांची रचना, जिल्यातील शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनासाठी शैक्षणिक संशोधन.
- ५. जिल्ह्यातील सेवापूर्व प्रशिक्षणाची गुणवत्ता संवर्धन व सनियंत्रण, शिक्षक व क्षेत्रीय अधिकारी यांच्या व्यावसायिक विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी.
- ६. विविध शैक्षणिक अध्ययन अनुभव, शैक्षणिक यशोगाथा, प्रयोग यांचे आदण प्रदान करण्यासाठी शैक्षणीक संस्कृती विकसित करणे.
- ७. जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्ता विविध पातळ्यांवरील क्षेत्रीय अधिका-यांच्या नियमीत नियोजन व आढावा बैठका घेऊन गुणवत्ता विषयक कामकाज आढावा‚ मार्गदर्शन व सहाय्य
- 8. शैक्षणीक गुणवत्ता वाढीसाठी गटसाधन केंद्र‚ समूह साधन केंद्र व शहर साधन केंद्र मधील मनुष्यबळाचे क्षमता संवर्धन व संनियंत्रण.
- 9. महाराष्ट्र विदया प्राधिकरण व प्रादेशिक विदया प्राधिकरण यांचेकडील निर्देशाप्रमाणे जिल्हयातील पूर्व प्राथमिक‚ माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी शिखर संस्था व जिल्हयाची शैक्षणीक गुणवत्ता संवर्धनासाठी आवश्यक कृतिकार्यक्रम राबविणे व अनुषंगिक सर्व शैक्षणिक व प्रशासनिक कार्य.
- 10. जिल्हयातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी श्रेणीनुसार कार्यक्रमाची अंमलबजावणी.
- 11. विविध प्रशिक्षणाचे प्रभावी व्यवस्थापन‚ नियोजन व अनुधावन वरून जिल्हयातील शिक्षक‚ क्षेत्रीय अधिकारी यांचे सक्षमीकरणासाठी कार्य.
परिचय :
- महात्मा गांधीजींच्या मुलोदयोगी शिक्षण योजनेतून शासकीय अध्यापक विदयालय म्हणून १९३९ रोजी लोणीकाळभोर येथे स्थापन झालेल्या शासकीय अध्यापक विदयालयाचे उच्चीकरण् होऊन १९९५ मध्ये या कार्यालयाची स्थापना. ३० ऑक्टोबर २०१८ पासून भवानी पेठ येथे स्थलांतरित.
- १७ ऑक्टोबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार जिल्हयातील शिक्षकांचे सातत्यपूर्ण व्यावसायिक सक्षमीकरण करण्यासाठी संस्थेचे नामकरण जिल्हा शैक्षणीक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था असे नामकरण करण्यात आले.
- शासन पत्र् क्रं. संकीर्ण - २०१८/प्र.क्र. ९२/ प्रशिक्षण दिनांक २५.१०.२०१८ अन्वये संस्थेच्या लोणी- काळभोर येथील कार्यालयाचे भवानी पेठ येथे स्थलांतरास मान्यता.
- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विदया प्राधिकरण)‚ सदाशिव पेठ‚ पुणे पासून अवघ्या ४.८ कि.मी. अंतरावर भवानी पेठ या ठिकाणी कार्यालय.